Thursday, October 1, 2026
Homeसातारासातारा : 'अहो शेठ लय दिवसानं झालीया भेट'; वसंतराव मानकुमरे यांचा डान्स...

सातारा : ‘अहो शेठ लय दिवसानं झालीया भेट’; वसंतराव मानकुमरे यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल | पुढारी

[ad_1]








पाचगणी; पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यात लक्षवेधी झालेल्या जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली. तर महाविकास आघाडीच्या पॅनलला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी ‘अहो शेठ लय दिवसानं झाली या भेट’ या गाण्यावर बेभान होऊन डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विजय मिळविल्यानंतर वसंतराव मानकुंरेंचा यांचा ‘अहो शेठ लय दिवसानं झाली भेट’, पाटलांचा बैलगाडा, या लावणीवर तुफान डान्स केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. यापूर्वी असाच डान्स वसंतराव मानकुमरे यांनी चैत्राली राजे यांच्या रंगमंचावर देखील केला होता. तो डान्स संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला होता. त्या डान्सनंतर बाजार समिती निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे गटाने बाजी मारली. त्यामुळे विजयी जल्लोष करताना मानकुमरे यांनी डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments