Wednesday, November 25, 2026
Homeफलटणबरड जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक विकासाला बळ ; ९० लाखांच्या सहा वर्गखोल्यांचे...

बरड जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक विकासाला बळ ; ९० लाखांच्या सहा वर्गखोल्यांचे भूमिपूजन!

जिल्हा परिषद सदस्य वैशाली कांबळे यांची ग्वाही; शाळेला सर्वतोपरी सहकार्य करणार


फलटण प्रतिनिधी :- बरड (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक विकासाला मोठे बळ मिळाले असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या सहा नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या नवीन वर्गखोल्यांच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली कांबळे, पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते, पंचायत समिती सदस्य स्वाती आटोळे आणि बरड गावचे सरपंच प्रकाश लंगुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली कांबळे म्हणाल्या की, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बरडच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे. बरड येथील शाळेसाठी मंजूर झालेल्या सहा वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना हक्काच्या आणि प्रशस्त वर्गखोल्या उपलब्ध होणार असून, शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होणार आहे.
या कार्यक्रमास बरड गावचे उपसरपंच बाळासाहेब काशीद, माजी सरपंच जनार्दन संतोष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष आडके, प्रा. दादासो टेंबरे, सेवा सोसायटीचे चेअरमन पोपट काशीद, व्हाईस चेअरमन लक्ष्मण टेंबरे, गुणवंत बागाव, हरी आडके, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उदयकुमार नाळे सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सहा नवीन वर्गखोल्यांच्या मंजुरीमुळे बरड गावच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments