रशियात एमबीबीएस पूर्ण केलेल्या डॉ. प्रणित घोरपडे यांची FMGE परीक्षेत यशस्वी भरारी!
फलटण : मौजे सासकल (ता. फलटण) येथील सुपुत्र किरण घोरपडे यांचे चिरंजीव डॉ. प्रणित उज्वला किरण घोरपडे यांनी रशिया येथे एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली परदेशी वैद्यकीय पदवीधर पात्रता परीक्षा (FMGE) उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशामुळे सासकलसह फलटण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी प्राप्त केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी FMGE ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते. संगणकाधारित पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेत ३०० बहुपर्यायी प्रश्न असतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान १५० गुण मिळवणे आवश्यक असते.
FMGE परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामध्ये भारतातील मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयात १२ महिन्यांची अनिवार्य रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप (CRMI) पूर्ण करणे आणि त्यानंतर संबंधित वैद्यकीय परिषदेकडे कायमस्वरूपी नोंदणी मिळवणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भारतात कायदेशीररीत्या वैद्यकीय सेवा देता येते.
डॉ. प्रणित उज्वला किरण घोरपडे हे आयु. पोपट केशव घोरपडे व आयुनि ताराबाई पोपट घोरपडे यांचे नातू आहेत. भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे व ऍड.रामचंद्र पोपट घोरपडे, आयु.कैलास शिवाजी घोरपडे यांचे पुतणे आहेत. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल प्रगत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.मंजिरी निंबकर, साप्ताहिक कालमान चे संपादक आयु. बापूराव जगताप, श्री.तात्यासाहेब गुसाळकर, श्री. महेश भिंगारे, श्री.जयवंत जाधव, माजी विस्तार अधिकारी आयु.विनायक लक्ष्मण शिंदे सर, आयु.काशिनाथ सोनवलकर सर, श्री.विश्वास जगदाळे, आयु. दत्ता अहिवळे सर, आयु.आबासो यादव, डॉ.राजगोपाल राधाकिशन खंडेलवाल, नगरसेवक आयु. सचिन अहिवळे, श्री. दीपक विष्णुपंत मुळीक, महालक्ष्मी झेरॉक्स सेंटरचे प्रोप्रायटर श्री.संतोष कदम,आयु.सुभाषराव बनसोडे, सहकारी आयु सतिश अहिवळे, आयु.संघराज अशोक निकाळजे, आयु.नंदकुमार निवृत्ती निकाळजे, आयु. आनंदराव निकाळजे सर, ऍड. विजय कदम, ऍड.मनोज जावळे, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर, माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर , माजी खजिनदार आयु.विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव बजरंग गायकवाड सर, आयु.अमोल भोसले सर, आयु. राजेंद्रकुमार गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे माजी उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे ऍड.चंद्रशेखर मोरे, संघटक आयु. आनंद जगताप सर, तसेच BBM Family, सासकल जन आंदोलन समिती यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कठीण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचा टप्पा यशस्वीपणे पार करणाऱ्या डॉ. प्रणित घोरपडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
