Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रसोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांची हरकत; अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास मनाई

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांची हरकत; अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास मनाई

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांची हरकत; अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास मनाई

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांचे नाव, छायाचित्र व प्रतिमा वापरल्याप्रकरणी जय अजितदादा पवार यांनी हरकत नोंदवली आहे. त्यांच्या हरकतीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी पुरुषोत्तम रामराजे जगताप यांच्या पॅनेलला संबंधित प्रचार साहित्य हटविण्याचे आदेश दिले आहेत.

जय पवार यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी हरकत अर्ज दाखल केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संबंधित पॅनेलकडून प्रचारासाठी अजितदादा पवार अथवा अजित पवार यांचे नाव, फोटो आणि प्रतिमा असलेले फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स, स्टिकर्स, पत्रके तसेच अन्य प्रचार साहित्य वापरले जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता.

या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या नावाचा किंवा प्रतिमेचा वापर असलेले प्रचार साहित्य तात्काळ वापरणे थांबवावे आणि यापूर्वी लावण्यात आलेले साहित्य काढून टाकावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा लेखी अनुपालन अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आदेशाचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात या आदेशानंतर संबंधित पॅनेलकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments