गुरुकुल प्रकल्पा च्या वाटचालीचा आढावा; विठ्ठल निकाळजे सरांचे शिक्षक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जिंती, ता. फलटण : रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत श्री. जितोबा विद्यालय, जिंती येथे गुरुकुल प्रकल्प समन्वयक आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी भेट देऊन गुरुकुल प्रकल्पाच्या विविध उपक्रमांचा व उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुरुकुल प्रकल्पाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिस्त, स्वावलंबन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी गुरुकुलाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या भेटीदरम्यान आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करणारे ‘कर्मवीरा’ हे प्रेरणादायी गीत सादर केले. त्यांच्या गीतातून कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची व विचारांची आठवण विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव एम. डी., गुरुकुल प्रमुख श्री. आवळे टी. एन., श्री. जगताप सर, श्री. साळुंखे सर तसेच इतर सर्व सेवकवर्ग उपस्थित होते. भेटीदरम्यान झालेल्या मार्गदर्शनामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना गुरुकुल प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली.
