फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची सदिच्छा भेट
फलटण | प्रतिनिधी :फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सन्माननीय माजी सभापती, पंचायत समिती फलटण तथा ज्येष्ठ नेते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या सेवा-संबंधित अडचणी, प्रलंबित मागण्या, बदली प्रक्रिया, प्रशासकीय प्रश्न तसेच शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्याशी चर्चा केली. शिक्षकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून संबंधित पातळीवर आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
या सदिच्छा भेटीप्रसंगी गटशिक्षणाधिकारी साहेब, फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्माननीय विकास नाळे, भारतीय जनता पार्टी फलटण शहर अध्यक्ष सन्माननीय बापुराव शिंदे आणि फलटण तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे समन्वय समिती पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या विविध संघटनांना एकत्रित आणून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर समन्वयाने चर्चा व पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
