Friday, September 11, 2026
Homeफलटणकालकथित योगेश रामचंद्र पवार यांच्या पुण्यानुमोदनानिमित्त बुद्धपूजा

कालकथित योगेश रामचंद्र पवार यांच्या पुण्यानुमोदनानिमित्त बुद्धपूजा

फलटण : कालकथित योगेश रामचंद्र पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देत पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगेश पवार यांच्या आठवणी आजही कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या मनात कायम आहेत.

“आठवणींच्या थव्यांनी मन सारे व्यापले…
भरल्या घरामध्ये तुम्हा, क्षणोक्षणी शोधले..
तुमच्या आदर्शावर आम्ही वाटचाल करू..
धरुनी सत्याची कास, सद्विचारांची पेरणी करू…”

या भावपूर्ण शब्दांत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले आहे. त्यांच्या जीवनातील आदर्श, सद्विचार आणि माणुसकीची शिकवण पुढील वाटचालीत जपण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात येणार आहे.          शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता रक्षा विसर्जन, तर सकाळी ११.०० वाजता बुद्धपूजा आयोजित करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम म्युनिसिपल कामगार कॉलनी, महात्मा फुले नगर, फलटण येथे होणार आहे. बुद्धपूजेच्या माध्यमातून कालकथित योगेश रामचंद्र पवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

या प्रसंगी समस्त पवार परिवार व महात्मा फुले नगर यांच्या वतीने योगेश पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments