जि. प. प्राथमिक शाळा सासकलच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक, उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक
फलटण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सासकलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर सदानंद मुळीक, तर उपाध्यक्षपदी दिनेश दत्तात्रय मुळीक यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे ग्रामपंचायत सासकल तसेच सासकल जनआंदोलन समितीच्या वतीने अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शाळेच्या भौतिक सुविधांच्या विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी प्रकाश गोरे, तात्यासो सर्जेराव मुळीक, अश्विनी अक्षय घोरपडे, नामदेव ज्ञानदेव मुळीक, दिनेश दत्तात्रय मुळीक, आरती किरण धुमाळ, जया संदिप मदने, प्रिया सागर मदने, शंकर सदानंद मुळीक, संजिवनी संतोष मुळीक, संगिता पोपट खोमणे, रविना सागर देवघरे, धनाजी हणमंत खोमणे तसेच शिक्षणतज्ज्ञ राजेंद्रकुमार आकोबा सस्ते उपस्थित होते.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मंगेश मदने, विनायक मदने, अनिल मुळीक, अतुल मुळीक, सागर माणिक चोपडे, नवनाथ खोमणे, नारायण मुळीक, बाळू आडके, सचिन पिसाळ, नामदेव मुळीक, सुरज मदने, निकिता घोरपडे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण कांबळे, शिक्षक सुधीर ढालपे, उपशिक्षिका चारुशीला जगदाळे तसेच गोरे मॅडम यांचीही उपस्थिती होती.
नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर मुळीक व उपाध्यक्ष दिनेश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांना प्रभारी सरपंच सोनाली मंगेश मदने व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.
