Tuesday, September 8, 2026
Homeफलटणउपवर्गीकरण विरोधी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खाटीक समाज संघटनेची बैठक

उपवर्गीकरण विरोधी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खाटीक समाज संघटनेची बैठक

१० सप्टेंबरच्या संविधान समर्थन मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन; जितेंद्र सरगर यांचे मार्गदर्शन

फलटण : अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संविधान समर्थन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खाटीक समाज संघटनेच्या वतीने फलटण येथे समाजबांधवांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये खाटीक समाजातील विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खाटीक समाज संघटनेचे जितेंद्र सरगर यांनी उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधत उपवर्गीकरणाच्या संभाव्य परिणामांबाबत आपली भूमिका मांडली.

जितेंद्र सरगर म्हणाले की, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झाल्यास त्याचा परिणाम समाजातील विविध घटकांवर होऊ शकतो. त्यामुळे समाजबांधवांनी या विषयाबाबत जागरूक राहून आपली भूमिका संघटितपणे मांडणे आवश्यक आहे.

दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चामध्ये खाटीक समाजातील महिला, पुरुष, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले

या बैठकीत उपस्थित समाजबांधवांनी एकजुटीने समाजाच्या प्रश्नांवर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच आगामी मोर्चामध्ये खाटीक समाजाचा सक्रिय सहभाग राहावा, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यासाठी संविधान समर्थन मोर्चाचे समर्थक आर.पी आय चे विजय येवले , संजय निकाळजे राजू मारुडा , बी टी जगताप सनी काकडे हरिष काकडे यांना मार्गदर्शन केले

खाटीक समाज संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या बैठकीस समाजातील विविध स्तरांतील नागरिक उपस्थित होते. उपस्थित समाजबांधवांनी आगामी संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

१० सप्टेंबर रोजी संविधान समर्थन मोर्चा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा मंगळवार पेठ समाज मंदिर येथून बारामती चौक मार्गे प्रांत कार्यालय, फलटण येथे जाणार असून, संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments