भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुका माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार
फलटण : भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुका माजी पदाधिकारी आणि BBM Family यांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा केंद्रीय शिक्षक आणि समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले साहेब यांचे चिरंजीव आयु. विकास दादासाहेब भोसले यांची बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये कृषी अधिकारी (JMG Scale-I) या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. बजरंग गायकवाड यांनी केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुका माजी पदाधिकारी तसेच BBM Family यांच्या वतीने BSI मिशन-25 अंतर्गत आयु. विकास दादासाहेब भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. आयु. दादासाहेब भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेले तसेच सध्या सुरू असलेले धम्मकार्य, त्यांचे कुशल कर्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
आयु. सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, विकास भोसले यांची जिद्द, चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रम यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. कुटुंबातील धम्मसंस्कार, शैक्षणिक जिद्द आणि मेहनतीची परंपरा यांचा सुंदर संगम त्यांच्या यशामागे आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक ममतासागर व महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर तसेच संपूर्ण आंबेडकर परिवारावर विश्वास ठेवून आयु. दादासाहेब भोसले हे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय शिक्षक तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर म्हणून जबाबदारीने कार्य करीत आहेत. धम्मकार्याबरोबरच आपल्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले.
BSI मिशन-25 अंतर्गत गुणवंतांचा सन्मान करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयु. विकास भोसले यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला, असे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, फलटण तालुका माजी पदाधिकारी व BBM Family सदस्य आयु. महावीर भालेराव – माजी अध्यक्ष, आयु. बाबासाहेब जगताप – माजी सरचिटणीस, आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे – माजी कोषाध्यक्ष, आयु. बजरंग गायकवाड – माजी संस्कार सचिव, आयु. रामचंद्र मोरे -प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष, माजी संघटक आयु. आनंद जगताप, आयु. सुवर्णा दिलीप कांबळे – माजी प्राचार्या, आयु. दिलीप कांबळे – बँक ऑफ इंडिया, सेवानिवृत्त अधिकारी, आयु. अरविंद आप्पाजी काकडे, आयु. शोभा अरविंद काकडे, आयु. प्रशांत अरविंद काकडे, आयु. काजल प्रशांत काकडे, आयु. भाग्यश्री विठ्ठल निकाळजे, आयु. विजय विठ्ठल निकाळजे, आयु. सागर दादासाहेब भोसले, आयु. सुप्रिया सागर भोसले आदी उपस्थित होते.
