प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँक्रीट रस्ता व गटर कामाचा शुभारंभ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना मिळणार चालना

0
24
प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँक्रीट रस्ता व गटर कामाचा शुभारंभ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना मिळणार चालना

प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँक्रीट रस्ता व गटर कामाचा शुभारंभ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना मिळणार चालना

फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील जुनी चावडी पिछाडी ते शेख यांचा घरांपर्यंत काँक्रीट रस्ता व काँक्रीट गटर बांधकामाच्या विकासकामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्ता व सांडपाणी व्यवस्थेची सुविधा उपलब्ध होणार असून, प्रभागाच्या विकासाला गती मिळणार आहे.

हे काम मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांच्या सूचनेनुसार तसेच आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेर नाईक निंबाळकर (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले.

यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) यांच्या हस्ते प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे, नगरसेविका मिना जीवन काकडे, नगरसेविका सुलक्षणा जितेंद्र सरगर, माजी नगरसेवक सनी अहिवळे, माजी नगरसेवक किशोर घोलप, RPI जिल्हा सचिव विजय येवले, नियाज हाजी कुरेशी, संजय निकाळजे, राजू मारूडा, जाकिर कुरेशी, शुकरहाजी कुरेशी, सुनिल अहिवळे, प्रशांत काकडे, लक्ष्मण अहिवळे, रोहन अहिवळे, बंडा इंगळे, गौतम घोलप, अमोल अहिवळे, प्रविण कांबळे, विजय अहिवळे, शिवा अहिवळे, अक्षय अहिवळे, संतोष इंगळे तसेच प्रभागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हरिश काकडे (आप्पा) यांनी केले, तर आभार नगरसेवक सचिन अहिवळे (सर) यांनी मानले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विकासकामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आवाहन करत नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या रस्ता व गटर प्रकल्पामुळे परिसरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय निर्माण होणार आहे.