Tuesday, September 1, 2026
Homeफलटणभारतीय संविधानामुळे माझ्या सारखा शेतकर्‍याचा मुलगा ऊच्च पदावर आहे.धन्यकुमार गोडसे उपविभागिय पोलीस...

भारतीय संविधानामुळे माझ्या सारखा शेतकर्‍याचा मुलगा ऊच्च पदावर आहे.धन्यकुमार गोडसे उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण.

भारतीय संविधानामुळे माझ्या सारखा शेतकर्‍याचा मुलगा ऊच्च पदावर आहे.
धन्यकुमार गोडसे उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण.

फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधान दिंडीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर केला.

या प्रसंगी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) धन्यकुमार गोडसे, मुख्याधिकारी निखिल जाधव, पोलीस निरीक्षक बल्लाळ, भीम जयंती महोत्सवाचे अध्यक्ष हरीश काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड, रिपाईचे ज्येष्ठ नेते विजय येवले, संजय निकाळजे, राजाभाऊ मारुडा, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका सुपर्णाताई अहिवळे, नगरसेविका मीनाक्षीताई काकडे, पत्रकार गोविंद मोरे, निखिल साबळे, सूरज अहिवळे, तानाजी जगताप, मनोज काकडे, आदर्श अहिवळे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे म्हणाले, “भारतीय संविधानामुळे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलालाही उच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समता, न्याय, बंधुता आणि ऐक्याचा संदेश देणारे असून प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. संविधान दिंडीमुळे शहरात संविधान जागर आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments