Sunday, August 30, 2026
Homeफलटणतनिष्का जगताप इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ताधारक; क्रांतीसिंह नाना पाटील...

तनिष्का जगताप इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ताधारक; क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूल व युथ असोसिएशनकडून सत्कार

तनिष्का जगताप इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ताधारक; क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूल व युथ असोसिएशनकडून सत्कार

फलटण, प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी आयु. बाबासाहेब दिलीप जगताप व आयुनि पारिजातका बाबासाहेब जगताप यांची कन्या तनिष्का पारिजातका बाबासाहेब जगताप हिने इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ताधारक होण्याचा मान मिळविल्याबद्दल तिचा विविध स्तरांतून गौरव करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने युथ असोसिएशन तसेच क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे मुख्याध्यापक श्री. अनिल खलाटे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तनिष्काचा शाल, पुष्पगुच्छ आणि वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक श्री. अनिल खलाटे यांनी तनिष्काच्या यशाचे कौतुक करत तिच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत तिने भविष्यातही अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
युथ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तनिष्काच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांसाठी तनिष्काचे यश प्रेरणादायी असून कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना तनिष्काने, “माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. पुढील काळात अधिक मेहनत घेऊन आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,” अशी भावना व्यक्त केली.

या सत्कार समारंभास युथ असोसिएशनचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments