Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रबारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदासाठी ॲड. हर्षद तिकोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सदस्यांना...

बारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदासाठी ॲड. हर्षद तिकोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सदस्यांना पाठिंब्याचे आवाहन

बारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदासाठी ॲड. हर्षद तिकोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सदस्यांना पाठिंब्याचे आवाह

बारामती | प्रतिनिधी :- बारामती बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ च्या निवडणुकीसाठी खजिनदार पदाच्या निवडणुकीत अॅड. हर्षद तिकोटे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कायदे क्षेत्रातील अभ्यासू, प्रामाणिक आणि सर्वसमावेशक कार्यशैलीमुळे अॅड. हर्षद तिकोटे यांच्याविषयी वकील बांधवांमध्ये विश्वासाचे वातावरण असून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे.

बारामती बार असोसिएशनच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि संघटनेच्या विकासासाठी प्रभावी नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त करत अॅड. हर्षद तिकोटे यांनी सर्व सदस्यांचा आशीर्वाद व सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

यावेळी बारामती बार असोसिएशनच्या सर्व माननीय सदस्यांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या बहुमोल मताचा योग्य वापर करून खजिनदार पदासाठी अॅड. हर्षद तिकोटे यांना आपला अमूल्य पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments