Sunday, August 23, 2026
Homeफलटणश्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावर ६ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक; सभासदांना उपस्थितीचे आवाहन

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावर ६ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक; सभासदांना उपस्थितीचे आवाहन

📰 श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावर ६ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक; सभासदांना उपस्थितीचे आवाहन

फलटण | प्रतिनिधी :-  फलटण तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान श्रीमंत  रामराजे नाईक निंबाळकर भूषविणार आहेत.

कारखान्याच्या सध्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील वाटचाल, पुनरुज्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना तसेच सभासदांच्या अपेक्षा व सूचनांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सध्या श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे कामगारांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार, व्यापारी आणि कारखान्याशी निगडित असलेल्या अनेक घटकांनाही आर्थिक फटका बसत आहे. तालुक्यातील हजारो कुटुंबांचे अर्थकारण या कारखान्याशी जोडलेले असल्याने त्याच्या भवितव्याबाबत सर्व स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, कारखान्याच्या भविष्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले जातात याकडे सभासदांसह संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या बैठकीस ऊस उत्पादक शेतकरी सभासद, सभासद बंधू-भगिनी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कारखान्याशी संबंधित सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाइस चेअरमन नितीन भोसले तसेच संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments