ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान! फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
8
ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान! फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान! फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

फलटण | प्रतिनिधी

“ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मधील विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयुक्त साहित्य वाटप कार्यक्रम खंडोबा मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.

या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते झाला होता. त्यानंतर मंगळवार, ३० जून रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक विकास काकडे, नगरसेविका स्मिता शहा, नगरसेवक विशाल (भैया) तेली, सूरज (भैया) जाधव, सिकंदर डांगे तसेच परिसरातील मान्यवर, नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर शालेय उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी व्हावा आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.