Wednesday, August 12, 2026
Homeफलटणनगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फलटण | प्रतिनिधी  फलटण नगर परिषदेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मा. आयु. सचिनसर अहिवळे यांचा वाढदिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हरिश काकडे यांच्या पुढाकाराने अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त भीम ज्योत प्रतिष्ठान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने नगरसेवक सचिन अहिवळे यांची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हालगी वाद्यांच्या गजरात आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रसंगी उपस्थितांनी पुष्पहार, शाल, फेटा देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुबक मूर्ती भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या कार्यक्रमास जयंती समितीचे अनिकेत अहिवळे, रोनित अहिवळे, प्रेम अहिवळे, साहिल अहिवळे, साई कांबळे, संघराज अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल नाना अहिवळे, नितीन अहिवळे, नगरसेविका मीनाताई काकडे, वर्षा काकडे, शिला काकडे तसेच जुनी चावडी परिसरातील महिला मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिन अहिवळे यांच्या सामाजिक, आरोग्य व लोकहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments