Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रशिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार बायपास मार्गावरील नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीला सुरुवात

शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार बायपास मार्गावरील नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीला सुरुवात

शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार बायपास मार्गावरील नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीला सुरुवात

अकलूज | प्रतिनिधी अकलूज शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रतापसिंह चौक ते जयसिंह चौक या बायपास मार्गावरील बंद व नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामास आज सुरुवात करण्यात आली. मा. शिवतेजसिंह मोहिते-पाटील (गटनेते तथा उपनगराध्यक्ष, नगरपरिषद अकलूज) यांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.

या मार्गावरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांकडून याबाबत सातत्याने मागणी होत असल्याने शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी संबंधित विभागाशी पाठपुरावा करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक सुविधांमधील त्रुटी तात्काळ दूर करणे यासाठी शिवतेजसिंह मोहिते-पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे शहरातील विविध विकासकामांना गती मिळत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पथदिव्यांच्या दुरुस्तीमुळे बायपास मार्ग अधिक प्रकाशमान होणार असून अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांचा व वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

अकलूज शहर अधिक सुरक्षित, प्रकाशमान आणि सुशोभित करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक सकारात्मक पाऊल असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments