पालखी मार्गावरील अतिक्रमणांवर नगरपालिकेची धडक कारवाई; उपअभियंत्यांच्या निवासस्थानाचे कंपाऊंडही पाडले

0
13
पालखी मार्गावरील अतिक्रमणांवर नगरपालिकेची धडक कारवाई; उपअभियंत्यांच्या निवासस्थानाचे कंपाऊंडही पाडले

फलटण | प्रतिनिध फलटण नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, या मोहिमेत कोणतीही गय न करता धडक कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) जागेवर झालेल्या अतिक्रमणावरही तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार संभाजी मोरे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, पालखी महामार्गावरील श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी वाहनचालक व पादचाऱ्यांना वाहतुकीदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील उपअभियंत्यांच्या निवासस्थानावरील वॉल कंपाऊंडवरही कारवाई केली. रस्त्याच्या काही भागात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरपालिकेने जेसीबीच्या साहाय्याने संबंधित कंपाऊंड पाडून टाकले. विशेष म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरही कारवाई करण्यात आल्याने शहरात या मोहिमेची मोठी चर्चा रंगली आहे.
या कारवाईमुळे श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते माळजाई मार्ग अतिक्रमणमुक्त होण्यास मोठी मदत होणार असून रस्त्याची रुंदी वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालक व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे संकुचित झालेला हा मार्ग आता मोकळा होत असल्याने “रस्त्याने मोकळा श्वास घेतला” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत