Friday, September 4, 2026
Homeक्रीडाफलटण एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध गटातील...

फलटण एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध गटातील विजेत्यांचा गौरव


फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थी, युवक तसेच प्रौढ धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
४० वर्षांवरील प्रौढ गटात अनुभवी धावपटूंनी विशेष लक्ष वेधून घेतले. पुरुष गटात माणिक नारायण कांबळे (चेस्ट नं. ६) यांनी दमदार धाव घेत प्रथम क्रमांक मिळवला, तर विशाल धोंडिबा शिलिमकर (चेस्ट नं. ४३) यांनी द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद पटकावले.
महिला गटात केनियाच्या जेन वांजिरू (चेस्ट नं. ४४) हिने आपल्या वेगवान आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर विजेतेपद मिळवत स्पर्धेचे आकर्षण ठरली. रंजना दत्तात्रय शेंडकर (चेस्ट नं. १५) यांनी उत्कृष्ट धाव घेत द्वितीय स्थान संपादन केले.
स्पर्धेच्या सांगता समारंभात महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, मार्गदर्शक, पोलीस प्रशासन, क्रीडाप्रेमी आणि सहभागी धावपटूंचे आभार मानले.
शिक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या यशस्वी आयोजनाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी आयोजनाचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments