Friday, September 11, 2026
Homeफलटणकेंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार

केंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार

केंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार

फलटण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालयीन सचिव, बौद्धाचार्य तथा धम्मकार्याशी निष्ठेने जोडलेले आयु. चंद्रकांत मोहिते यांची भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक म्हणून चैत्यभूमी, मुंबई येथे निवड झाल्याबद्दल पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

धम्मप्रसार, समाजप्रबोधन आणि बौद्ध संस्कार जोपासण्यासाठी आयु. मोहिते यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे, हिंदुराव गायकवाड, अमोल झेंडे, प्रवीण पवार, कार्यकारी संपादक शेखर गायकवाड, युवराज चोपडे, गणेश भोईटे तसेच इतर पत्रकार व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना आयु. चंद्रकांत मोहिते यांनी व्यक्त केलेल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही निवड माझा वैयक्तिक सन्मान नसून बुद्ध, धम्म आणि संघाच्या कार्यासाठी झटणाऱ्या सर्व धम्मबंधू-भगिनींचा सन्मान आहे. भविष्यातही धम्मप्रसार आणि समाजप्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे.”

उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, केंद्रीय शिक्षक म्हणून त्यांच्या माध्यमातून बुद्धधम्माचा विचार अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments