Sunday, August 30, 2026
Homeफलटणसमतानगर बुद्ध विहारात पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांची प्रभावी धम्मदेशना

समतानगर बुद्ध विहारात पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांची प्रभावी धम्मदेशना

समतानगर बुद्ध विहारात पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांची प्रभावी धम्मदेशना

अनित्य, अनात्म व दुःख समजल्याशिवाय जीवन समजत नाही’ – पूज्य भंते करुणानंद महाथेरो

फलटण : पूज्य भंते करुणानंद थेरो यांच्या प्रभावी धम्मदेशनाने समता नगर विडणी परिसर भारावला
फलटण तालुक्यातील समता नगर, विडणी येथे कालकथित सुमनताई सचिन मोहिते यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित जाहीर धम्मदेसना कार्यक्रम अत्यंत श्रद्धामय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी पूज्य भंते करुणानंद थेरो यांनी उपस्थितांना बुद्ध धम्म, मानवी जीवन, दुःख, अनित्यता आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीविषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध, सद्‌धम्म आणि पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून भंतेजींनी आपल्या धम्मदेशनास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, “तथागत बुद्धांनी संपूर्ण मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दिला. बुद्धांचा धम्म हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहे.”

भंतेजींनी कालकथित सुमनताई मोहिते यांच्या धम्मविषयक विचारांचा उल्लेख करत “शारीरिक दुःख असतानाही बुद्धधम्मामुळे मानसिक आनंद मिळतो,” असे त्या नेहमी सांगत असत, असे भंतेजींनी भावनिक शब्दांत सांगितले. धम्मदेसनेमध्ये भंते करुणानंद थेरो यांनी बुद्धांच्या “अनित्य, अनात्म आणि दुःख” या त्रिसूत्री सिद्धांताचे अत्यंत सोप्या भाषेत विवेचन केले. जीवन हे क्षणभंगुर असून प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येते, मात्र बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग हा त्यावरील उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पटाचारा, किसा गौतमी, विशाखा यांसारख्या बौद्ध धम्मातील महामातांचा दाखला देत मानवी जीवनातील दुःख, मृत्यू आणि परिवर्तन शीलता यांचे वास्तव समजावून सांगितले. “जन्म झाला म्हणजे मृत्यू अटळ आहे. त्यामुळे अहंकार, लोभ आणि द्वेष बाजूला ठेवून शील, सदाचार आणि माणुसकीचा मार्ग स्वीकारणे हेच खरे जीवन आहे,” असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा उल्लेख करताना भंतेजी म्हणाले की, “बाबासाहेबांनी बुद्धधम्म स्वीकारून मानवमुक्तीचा मार्ग दिला. त्यांनी दिलेल्या विचारांचा प्रचार आणि आचरण करणे ही प्रत्येक बौद्धाची जबाबदारी आहे.” पश्चिम महाराष्ट्रात धम्मकार्य अधिक व्यापक करण्यासाठी कराड परिसरात प्रशिक्षण व साधना केंद्र उभारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. “या भागात बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार वाढविण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, राज्य संघटक व पुणे व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले, भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका अनुराधा धनसिंग सोनवणे, केंद्रीय शिक्षक तथा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण माजी कार्यकारणी माजी अध्यक्ष महावीर भालेराव, सरचिटणीस बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, संघटक अमोल काकडे, आनंद जगताप व समतानगर बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने भंते करुणानंद महाथेरो यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ, चिवर व धम्मदान देण्यात आले.

बौद्ध धम्म संस्कार पद्धतीमध्ये कालकथित सुमनताई सचिन मोहिते यांच्या स्मरणार्थ लावलेल्या बोधिवृक्षाच्या पहिल्या स्मृतिदिनी विशेष श्रद्धापूर्वक भंते करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते “बोधिवृक्ष पूजन व धम्मस्मरण विधी” करण्यात आला.भंते आणि नातेवाईकांनी बोधिवृक्षाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण केले. उपस्थित सर्व उपासक -उपासिका यांनी शांतपणे वृक्षाभोवती भंते करुणानंद यांच्या समवेत प्रदक्षिणा घालून सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी मेत्ताभावना केली. हा विधी कृतज्ञता, स्मरण आणि धम्मनिष्ठ जीवनाचा संदेश देणारा असतो.

यावेळी भंते करुणानंद महाथेरो यांनी समतानगर येथील बुद्ध विहार भेट दिली. महामानवांना वंदन करून त्यांनी सर्व बौध्द उपासक – उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून धम्माच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी व समतानगर येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी फुलांचा वर्षाव करत भंते करुणानंद महाथेरो यांचे उस्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, राज्य संघटक, पुणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासो मोहिते, महिला अध्यक्ष सुजाता गायकवाड, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचीव सोमीनाथ घोरपडे, फलटण तालुका अध्यक्ष भीमराव लोंढे, सरचिटणीस केशव ठोंबरे, कोषाध्यक्ष राजकुमार रणवरे, महिला अध्यक्षा रंजना रणवरे व फलटण तालुका कार्यकारिणीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीच्या महिला विभाग प्रमुख चित्राताई गायकवाड, प्रा. एम. टी ढोले, माजी तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत, केंद्रीय शिक्षक अरुण गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष हरिष काकडे, पिंपळपान ग्रंथालयाचे आबासो यादव, शाखा पुणे जिल्हा पूर्वचे उपाध्यक्ष लक्ष्मण भोसले, सचिव शिंदे सर, बारामती शहर अध्यक्ष भारत सोनवणे, सचिव डॉ. लोंढे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष राजू मोरे, महिला केंद्रीय शिक्षक कदम मॅडम, समता सैनिक दलाचे सैनिक कदम, पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष दादा गायकवाड उपस्थित होते.

जिल्हा, तालुका पदाधिकारी, सचिन मोहिते यांचे सर्व कुटुंबिय, बौध्द उपासक-उपासिका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मोहिते परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.तसेच सर्वांनी भोजनदान देण्यात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments