“शिस्त, संघटन आणि समता हीच समता सैनिकाची खरी ओळख” – दादासाहेब भोसले

0
11
“शिस्त, संघटन आणि समता हीच समता सैनिकाची खरी ओळख” – दादासाहेब भोसले

“शिस्त, संघटन आणि समता हीच समता सैनिकाची खरी ओळख” – दादासाहेब भोसले

पाचगणी : भारतीय बौद्ध महासभा, पाचगणी शाखा व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ मे रोजी समता सैनिक दलाचे विशेष प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २१ मे १९३८ रोजी पाचगणी येथे दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराला राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, पुणे विभाग व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून सैनिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी समता सैनिक दलाची कार्यपद्धती, शिस्त, संघटनात्मक बांधणी, सामाजिक जबाबदारी तसेच आंबेडकरी चळवळीतील सैनिकांची भूमिका याविषयी सखोल माहिती दिली.

तसेच सैनिक शिक्षक मेजर संपत भोसले, मेजर पी. एस. सातपुते आणि समता फोर्सच्या कंपनी कमांडर अर्चना चव्हाण मॅडम यांनी उपस्थित सैनिकांना प्रशिक्षण देत संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. शिबिरामध्ये सैनिकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा पाचगणी शाखेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. महासचिव व समता सैनिक दलाचे कंपनी कमांडर महेंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष सचिन कांबळे, संस्कार सचिव उत्तम कांबळे, सचिव खरात साहेब, छाया परिहार, आशा सोनवणे तसेच महिला व पुरुष सैनिकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.ú

या शिबिरामुळे युवकांमध्ये समता सैनिक दलाबद्दल जागर निर्माण झाला असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.