
फलटणकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे !
फलटण : फलटण नगरपरिषदेचा पाणी पुरवठा व आरोग्य विभाग हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणारे आणि शहाराचे आरोग्य अबाधित राखणारे अत्यंत महत्त्वाचे विभाग आहेत.
या दोन्ही विभागांमध्ये नागरिकांच्या हिताला चुना लावला जात आहे मनमानी पद्धतीने कारभार सुरू होवून यंत्रणा हाताबाहेर जाऊन ऐशीतैशी झाली आहे,कोण कोणाचे ऐकायच्या मानसिकतेत नाही.
न. प.चा पाणीपुरवठा विभाग म्हणजे मूलभूत जीवन आधार आहे, तसेच आरोग्य व स्वच्छता विभाग म्हणजे शहाराचे आरोग्य आहे.
फ.न .प. च्या हद्दीत पाणी पुरवठा विभागाला मरगळ आली आहे, दरमहा या विभागांवर लाखो रुपये चा खर्च केला जातो निष्कर्ष मात्र २० टक्के, ज्या भागात काम करायचे असेल तर तिथे सुरुवातीला स्थानिक नागरिकांना दिलासा म्हणून पूर्व कल्पना द्या, त्यांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्यांदा घरात पाणी साठवण करण्यासाठी सूचना द्यावी वेळप्रसंगी पाणी टॅकर न सांगता वेळेत पाठवा, शहरातील उद्याच्या तीस वर्षांपुढील नियोजन करुन नविन गुणवत्ता पूर्ण पाइपलाइन टाकली जावी.
संबंधित विभागाचे सभापती , सदस्य, अधिकारी कर्मचारी वृंद यांनी सदैव संवेदनशील असले पाहिजे फोन उचलावेत ,जमत नसेल तर थोड्या वेळाने फोन करा, काही मंडळी नेत्यांनी फोन केला तर उचलला जात आहे. आत्ता इथून पुढे असला दळभद्री कारभार खपवून घेतला जाणार नाही.
आरोग्य विभागात सुध्दा असाच कारभार सुरू आहे.
या विभागात नगरपरिषदेचे अंदाजपत्रकानुसार झालेली तरतूद व उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर जनकल्याणासाठी झाला पाहिजे, कार्यकर्ते आणि ठेकेदार सांभाळण्यासाठी नकोय , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार एकूण महसुली उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा मूलभूत सोयीसुविधा वर खर्च होतो.
पाणीपुरवठा विभागाच्या वीज बिल, पाणी पट्टी वसुली, जलवाहिनी ची देखभाल , खरेदी आणि दुरुस्ती यांवर सर्वाधिक खर्च होत आहे, तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होईल मात्र तसं होत नाही.
आरोग्य व स्वच्छता विभाग मध्ये घनकचरा व्यवस्थापन, कर्मचारी यांचे वेतन व लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे.
राज्य शासनाच्या विविध योजना त्यामध्ये सुवर्ण जयंती नगरोतथान महाभियान, इतर विशेष नागरी योजना, मलनिस्सारण व पाणीपुरवठा प्रकल्प करता कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो.
केंद्र आणि राज्य वित्त आयोगाकडून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकरता विशेष अनुदान दिले जाते हे कुठं किती टक्के जाते हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे.
काही वर्षांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कौशल्याने व दूरदृष्टी च्या माध्यमातून चौथ्या टप्प्यातील पाणी साठवण क्षमता व विविध भौतिक सुविधा उपलब्ध केल्याने आजही शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला नाही , कॅनाल पाणी एक महिना नाही आलें तरी पाणी साठवण क्षमता मजबूत असल्याने नागरिकांना होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली जात नाही याचं सर्व श्रेय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जाते .
बादशाही मस्जिद समोर सदैव कचरा पडलेला असतो त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून कचरयाचा ढिग पडलेला असतो.
त्या ठिकाणी खाजगी कामगार (कंत्राटी पद्धतीने) नेमून ठेवला पाहिजे म्हणजे नागरिक, व्यापारी, भाजी विक्रेते तिथे कचरा टाकणार नाहीत.
हे त्या विभागातील अधिकारी कर्मचारी व सभापती , स्थानिक सदस्य चे काम आहे मात्र तसं होताना दिसून येत नाही.
लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी वास्तविक पाहता दरमहा या विभागात जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले पाहिजे व लोकाभिमुख प्रशासन चालवावे असे एक जबाबदार नागरिक म्हणून वाटत आहे, तशा पध्दतीने काम न झाल्यास जनतेच्या जन आक्रोशाला सामोरे जावे लागेल यांची खबरदारी घ्यावी.
शहारातील विकास प्रकल्प करता कोणीही पदरमोड किंवा खिशातून* पैसे खर्च करीत नाही .
फलटण शहरातील विविध समस्या दूर करण्यासाठी पत्रकार बंधूंनी प्रभावी उपाय योजना कशा पद्धतीने होतील याकरिता एक आदर्श व जबाबदार नागरिक म्हणून सदैव संवेदनशील असतातच मात्र अजूनही स्पष्ट व रोखठोकपणे प्रसिद्ध केल्यास लवकर निदान होईल
झाडे लावा झाडे जगवा…. हरित फलटण…मी फलटण कर








