Monday, August 17, 2026
Homeफलटणफलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा

फलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा

फलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा

फलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा
फलटण : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून फलटण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्तनगर, फलटण येथे राहणाऱ्या अनिकेत संतोष घाडगे या युवकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टचा राग मनात धरून अजीम हसन आतार या युवकाने अनिकेत घाडगे याला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच पोस्ट डिलीट न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढे संतप्त झालेल्या आरोपीने अनिकेत घाडगे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली आणि पुन्हा अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या अनिकेत घाडगे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी अजीम हसन आतार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ फलटण शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात आला. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी केली.
फलटण हे सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या ऐक्याचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सामाजिक प्रबोधन आणि समाजामध्ये सलोखा टिकवणे आवश्यक असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments