Saturday, September 12, 2026
Homeफलटणफलटण नगरपालिकेत ‘ऑपरेटरची सत्ता’? २३ वर्षे एकाच पदावर, हस्तक्षेपाचे गंभीर आरोप

फलटण नगरपालिकेत ‘ऑपरेटरची सत्ता’? २३ वर्षे एकाच पदावर, हस्तक्षेपाचे गंभीर आरोप

फलटण : फलटण नगरपालिकेत ‘ऑपरेटरची सत्ता’? २३ वर्षे एकाच पदावर, हस्तक्षेपाचे गंभीर आरोप
फलटण (प्रतिनिधी): फलटण नगरपालिकेत प्रशासन खरोखर नियमांनुसार चालते की एका कर्मचाऱ्याच्या प्रभावाखाली—असा थेट प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. कारण २००३ साली पंप ऑपरेटर म्हणून रुजू झालेला विनोद नावाचा कर्मचारी तब्बल २३ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असून, त्याच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर आरोप समोर येत आहेत.
पद ऑपरेटरचं, पण अधिकार ‘साहेबां’सारखे?
पाणीपुरवठा विभागात नियुक्ती असतानाही संबंधित कर्मचारी अनेकदा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच वावरत असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे, तर आरोग्य विभागात स्वतंत्र अधिकारी आणि पाच SI असतानाही तो तेथील कामात हस्तक्षेप करत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. त्यामुळे “तो नेमक्या कोणत्या अधिकारात आदेश देतो?” असा सवाल उपस्थित होतो.
कामापेक्षा ‘सेटिंग’वर भर?
पालिकेचा कर्मचारी असूनही प्रत्यक्ष कामापेक्षा राजकीय नेत्यांच्या जवळीक साधण्यातच त्याचा अधिक वेळ जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे “तो पालिकेचा नोकर आहे की दलाल?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नागरिक त्रस्त, प्रशासन मौन
नागरिकांच्या मते, कामासाठी कार्यालयात गेल्यावर अधिकारी ऐकून घेतात, मात्र हा कर्मचारी थेट आदेश देत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “आम्ही नागरिक आहोत की त्याचे कर्मचारी?” असा रोष व्यक्त होत आहे.
२३ वर्षे एकाच जागी—योगायोग की वरदहस्त?
एखादा कर्मचारी इतक्या वर्षांपासून एकाच पदावर टिकून राहणे हे केवळ योगायोग आहे का, की यामागे राजकीय पाठबळ आहे? प्रशासनावर दबाव टाकून आणि नेत्यांशी जवळीक वापरून स्वतःची ‘सत्ता’ निर्माण केल्याची चर्चा रंगत आहे.
मुख्याधिकाऱ्यांची भूमिका काय?
सामान्य कर्मचाऱ्यांवर नियम काटेकोरपणे लागू केले जातात, मात्र प्रभावशाली व्यक्तींवर कारवाई का होत नाही? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल का, की ही स्थिती अशीच कायम राहणार—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments