सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत; पण शिवसेना, राष्ट्रवादीकडून जाणूनबुजून…; एकनाथ

0
1


Shivendra Raje Bhosale on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी खालच्या पातळीचे राजकारण झाल्याची आणि याचा हिशोब चोख करणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा भाजपला साताऱ्यातील सभेत दिला होता. मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे. 

आम्ही युती म्हणून एकत्र काम करतो आहे. जिल्हा परिषदेला जे झालं ते स्थानिक राजकारण होतं. जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत मिळालं होते. मात्र, जाणून बुजून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. एकत्र काम करू, असं आमचे म्हणणे होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 33 च्या मॅजिक फिगरपर्यंत आम्ही पोहचलो नसलो तरी पक्ष नेतृत्वाची देखील अपेक्षा होती. रायगडमध्ये टोकाचा विरोध असताना देखील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केलीच ना, असे सांगत साताऱ्यात एवढा टोकाचा विरोध तरी नव्हता, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. हा जिल्ह्याचा विषय होता आणि तो विषय आता संपला आहे, असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले. 

Shivendra Raje Bhosale : शिवसेनेला भाजपाचा धोका वाटतो का?

जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे या भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्या भाजपच्या असल्याने आम्ही त्यांचे नाव पुढे केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना ते सांभाळू शकले नाहीत, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे. शिवसेनेला भाजपाचा धोका वाटतो का? हे त्यांना विचारले पाहिजे, अशी कोपरखळी देखील त्यांनी लगावली. आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्याचे काम चांगले सुरू आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे, असे देखील शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.   

Shivendra Raje Bhosale : ती गोष्ट देवेंद्र फडणवीस पण खपवून घेणार नाहीत 

दरम्यान, NCERT च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या विषयावर बोलत असताना शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विषयाबाबत 100 टक्के संवेदनशील असून कोणती चुकीची गोष्ट घडली तर ते खपवून घेणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.  शासनाकडून याबाबत नक्की कारवाई होईल. हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे. मराठा साम्राज्य किंवा छत्रपती यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 100 टक्के संवेदनशील आहेत. केंद्राकडून किंवा राज्याकडून छत्रपतींबाबत कुठलीही चुकीची गोष्ट झाली तर ती गोष्ट देवेंद्र फडणवीस पण खपवून घेणार नाहीत. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय नक्की होईल, असे देखील त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Sushma Andhare on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, तुम्ही महिलांना तुच्छ लेखतात, तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंचा सडकून प्रहार; मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ आव्हानही स्वीकारलं

आणखी वाचा



Source link