Wednesday, August 26, 2026
Homeसाताराभव्य “भीम फेस्टिव्हल” मध्ये शाहिर विजय सरतापे यांची सुरेल भीमगीतांची मैफल

भव्य “भीम फेस्टिव्हल” मध्ये शाहिर विजय सरतापे यांची सुरेल भीमगीतांची मैफल

फलटण प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर), फलटण येथे दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी भव्य “भीम फेस्टिव्हल” उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात “प्रबुद्ध हो मानवा” फेम शाहिर विजयजी सरतापे यांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण सादरीकरणातून भीम व बुद्ध गीतांची मैफल रंगवली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षक त्यांच्या सुरेल आवाजाने अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. भीमगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रभावी उजळणी करण्यात आली. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समाजात प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक महोत्सव विशेष ठरला.
युवकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण व्हावी आणि आंबेडकरी विचारांची प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. स्थानिक नागरिकांसह परिसरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
आयोजकांनी हा महोत्सव भव्य स्वरूपात यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून, सर्व स्तरातील नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments