Thursday, August 20, 2026
Homeसाताराभारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र व केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या BSI मिशन 25 अंतर्गत सर्व महापुरुष व महामातांना अभिवादन करण्याचा उपक्रम सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाला आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. स्वराज्य, समता, न्याय आणि स्वाभिमान या मूल्यांची जपणूक करणे हीच शिवरायांना खरी आदरांजली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास आयु. महावीर भालेराव, आयु. बाबासाहेब जगताप, आयु. बजरंग गायकवाड, आयु. आनंद जगताप, आयु. स्वप्निल गायकवाड, आयु. चंद्रकांत मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला असून सन २०२६ मध्ये त्यांची ३९६ वी जयंती साजरी होत आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे शिवाजी महाराज हे शूर, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी शासक होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments