झोपल्यावर तुमच्याही तोंडातून लाळ येते? सावधान! असू शकतात असुरक्षित आरोग्याचे संकेत

0
5
झोपल्यावर तुमच्याही तोंडातून लाळ येते? सावधान! असू शकतात असुरक्षित आरोग्याचे संकेत


Causes And Side Effects Of Drooling While Sleeping: तोंडातील लाळ दातांची स्वच्छता, पचन संस्था सुधारणे यांसारख्या कार्यांमध्ये फायदेशीर ठरते. पण तुम्ही निरिक्षण केले असेल की, सकाळी झोपेतून उठल्यानंतर उशी ओली दिसते, ओठांच्या बाजूला पांढरे डाग असतात. हे रात्री झोपेत तोंडातील लाळ बाहेर आल्यामुळे होते. गाढ झोप लागली म्हणून किंवा तोंड उघडं ठेवून झोपल्याने तोंडामधील लाळ बाहेर आली असेल असे समजून याकडे दुर्लक्ष करत असाल तर, असा विचार करणं आत्ताच थांबवा. कारण हे कधीतरी न होता रोज होत असेल तर, असुरक्षित आरोग्याचे मोठे संकेत असू शकते. चला तर मग जाणून घेऊया, काय आहेत यामागची कारणे? आणि यामुळे कोणत्या आजारांचा धोका असू शकतो? 

Add Zee News as a Preferred Source

 

झोपल्यानंतर तोंडातून लाळ का येते?

आरोग्य तज्ज्ञांनुसार, झोपल्यानंतर लाळ गळण्याच्या स्थितीला ‘सियालोरिया’ किंवा ‘हाइपरसलावेशन’ असे म्हटले जाते. या स्थितीत तोंडातून अत्याधिक लाळ गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या थेट झोपेचे आरोग्य आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे यामागचे कारण आणि उपाय सर्वांना माहित असणे आवश्यक आहे. 

 

झोपल्यानंतर तोंडातून लाळ येण्याचे कारण काय? 

चुकीची झोपण्याची पद्धत:

झोपल्यानंतर तोंडातून लाळ येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोपणे. तुम्ही जर रात्रभर एकाच कुशीवर झोपता किंवा पोटावर (उपडी) झोपता तर तुम्हाला या समस्येला अधिक जाणवेल. कारण गुरुत्वाकर्षणामुळे लाळ तोंडात रोखली जाऊ शकत नाही, ज्यामुळे ती उशीवर सांडते. 

 

नाक बंद होण्याच्या समस्या

जर तुम्हाला सर्दी झाली असेल, सायनसची समस्या असेल तर, झोपेत नाक बंद होऊ शकतो. नाक बंद झाल्यामुळे व्यक्ती तोंडाने श्वास घेऊ लागतो. यामुळे झोपताना तोंड उघडे राहते. यामुळे देखील झोपेत तोंडातून लाळ येते. 

 

अ‍ॅसिड रिफ्लेक्स

अ‍ॅसिड रिफ्लेक्सची समस्या असल्यास यामुळे झोपेच्या स्थितीत पोटातील अ‍ॅसिड वर येऊन घशाला जळजळ होते. हे अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी शरीर अतिरिक्त लाळ निर्माण करते. यामुळे झोपेत लाळ येण्याची समस्या उद्धभवते. 

 

औषधांचे दुष्परिणाम

काहीवेळा औषधांचा दुष्परिणाम होऊन देखील तोंडातून लाळ येण्याची शक्यता असते. विशेषतः मानसिक आजार किंवा अल्जाइमरच्या निदानासाठी असलेल्या औषधांमुळे शरीरात अत्याधिक लाळ निर्मिती होते. जर तुम्हालाही असे आजार असतील आणि औषधांचे सेवन केल्यानंतर तोंडातून लाळ येण्याची समस्या होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नये. 

 

स्लीप एपनियाचे लक्षण 

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती झोपताना घोरत असेल, सारखी झोप मोड होत असेल तसेच झोपल्यानंतर तोंडातून लाळ येत असेल तर, हे स्लीप एपनिया या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. 

 

झोपताना तोंडातून लाळ येणे कसे थांबवाल?

यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे, कुशीवर किंवा पोटावर झोपण्याऐवजी पाठीवर झोपण्याची सवय करा. जर झोपेत नाक बंद होत असेल तर, झोपण्याआधी वाफ घेणे फायदेशीर ठरेल. दिवसभर पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमी भासणार नाही. कोणत्याही औषधांमुळे ही समस्या जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या





Source link