तुमच्याही शरीरात ‘हे’ बदल दिसतायत? असू शकतात कर्करोगाचे संकेत, आत्ताच सावध व्हा!

0
21
तुमच्याही शरीरात ‘हे’ बदल दिसतायत? असू शकतात कर्करोगाचे संकेत, आत्ताच सावध व्हा!


Know Which Are The Early Signs Of Cancer: कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्याचे नाव ऐकताच सर्वांच्या कपाळावर आठ्या पडतात. एका संशोधनानुसार, कर्करोगामुळे जगभरात दररोज सुमारे 26,000 पेक्षा जास्त लोक मृत्यू मुखी पडतात. कर्करोग झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यभर मृत्यूशी झुंज द्यावी लागते. कर्करोगाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचवेळा उपचारासाठी उशीर होतो आणि आरोग्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते. पण तुम्हाला माहीत आहे का? शरीरात होणारे काही सामान्य बदल कर्करोगाचे संकेत देत असतात. पण याबाबत योग्य माहीती नसल्याने दुर्लक्ष केले जाते. तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत असे घडू नये यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. सदर लेखात याबाबत सविस्तर जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

 

वजनात अचानक घट होणे

बऱ्याचवेळा व्यायाम आणि डाएटिंग न करताही अचानक वजनात घट होते. कामाची व्यस्थता, धावपळ, खाण्याच्या वेळांची अनियमितता यामुळे वजनात अचानक घट होत आहे. असे मानून याकडे दुर्लक्ष केले जाते. पण शरीरात होणारा हा बदल कर्करोगाच्या सुरूवातीचा मोठा बदल आहे. जर 1 किंवा 3 महिन्यात तुमचे वजन 4 ते 5 किलो पर्यंत अचानक कमी झाले तर, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. हे फु्फ्फुसांच्या कर्करोगाचे सुरूवातीचे लक्षण असू शकते. 

 

सतत जास्त प्रमाणात थकवा येणे

दिवसभर काम आणि धावपळ केल्याने थकवा येणे हे सामान्य मानले जाऊ शकते. पण योग्य प्रमाणात झोप आणि आवश्यक आहार घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर, सावध व्हा. कारण, कर्करोगाच्या सुरुवातीला सतत थकवा येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे अशी सामान्य पण गंभीर समस्या उद्भवतात. हे पोटाच्या किंवा रक्ताच्या कर्करोगाचे सुरूवातीचे लक्षण असू शकते. 

 

सतत अंगदुखी असणे

तुम्हाला रोज अंगदुखी जाणवत असेल, तसेच डोके दुखी जाणवत असेल तर हे देखील कर्करोगाच्या सुरूवातीची लक्षणे असू शकतात. विशेषतः तुम्हाला सतत डोके दुखी जाणवत असेल तर, याकडे दुर्लक्ष करू नका. कारण सततच्या सामान्य डोके दुखीचे रूपांतर मायग्रेनमध्ये होऊन ते ब्रेन ट्यूमरचे मोठे कारण बनू शकते. तसेच रोजची पाठदुखी पुढे गंभीर स्वरूप घेऊन कोलोन किंवा प्रोस्टेट कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते. 

 

सतत ताप येणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते ताप तेव्हा येतो जेव्हा आपले शरीर एखाद्या अंतर्गत इन्फेक्शनशी लढत असते. जसे की, सर्दी-खोकला झाल्यावर ताप येणे सामान्य मानले जाते. पण तुम्हाला सतत ताप येत असेल तर, हे रक्ताच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. 

 

त्वचेवर होणारे परिणाम 

त्वचेचा रंग गडद किंवा पिवळसर होणे, डोळ्यांचा रंगही पिवळसर दिसणे, त्वचेला खाज सुटणे किंवा लाल चट्टे येणे. ही लक्षणे देखील सामान्य असली तरीही त्वचेच्या कर्करोगाची सुरूवात असू शकते. 

 

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला वरील लक्षणे जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि कर्करोगापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी ही बातमी नक्कीच शेअर करा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link