पांथस्थ आयोजित ‘ओरिसा’ अभ्यास दौरा : २४ ते ३० मार्च २०२६

0
43
पांथस्थ आयोजित ‘ओरिसा’ अभ्यास दौरा : २४ ते ३० मार्च २०२६

साहस Times :- पांथस्थच्या वतीने ऐतिहासिक, सांस्कृतिक व पुरातत्वीय वारशाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘ओरिसा अभ्यास दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यास दौरा २४ मार्च ते ३० मार्च २०२६ दरम्यान होणार असून, तो ५ रात्री व ६ दिवसांचा असेल. या दौऱ्यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख २३ जानेवारी २०२६ आहे.
या अभ्यास दौऱ्यात ओरिसा राज्यातील बौद्ध, जैन व हिंदू परंपरेशी संबंधित महत्त्वाच्या पुरातत्वीय व ऐतिहासिक स्थळांना भेट दिली जाणार आहे. अभ्यास दौऱ्याच्या कार्यक्रमात पुढील स्थळांचा समावेश आहे —
ललितगिरी पुरातत्वीय स्थळ व वस्तुसंग्रहालय, उदयगिरी व रतनगिरी पुरातत्वीय स्थळे, खंडगिरी लेणी समूह, शांती स्तूप, कलिंग युद्ध अभिलेख, कोणार्कचे प्रसिद्ध सूर्य मंदिर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कुरुमा, जिरंग व लांगुडी ही महत्त्वाची पुरातत्वीय स्थळे तसेच चिलिका सरोवर व परिसरातील प्रेक्षणीय स्थळे.
या अभ्यास दौऱ्याचा उद्देश इतिहास, शिल्पकला, स्थापत्य, धर्मपरंपरा व सांस्कृतिक वारसा यांचा प्रत्यक्ष अभ्यास करणे हा आहे. अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांनी व इतिहासप्रेमींनी ‘अभ्यास दौऱ्यावर येणार असाल तरच समूहात जोडून घ्यावे’, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
अभ्यास दौऱ्याबाबत अधिक माहिती व सहभागासाठी खालील व्हॉट्सअ‍ॅप समूहात सहभागी होता येईल —
समूह लिंक : https://chat.whatsapp.com/DujnLnSJ3okEbS74NHApNF
सुरज रतन जगताप
.      (लेणी अभ्यासक )