Wednesday, August 12, 2026
Homeसाताराक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीस चालना – फलटणमध्ये पोलीस भरती पुस्तकांचा...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीस चालना – फलटणमध्ये पोलीस भरती पुस्तकांचा संच भेट


फलटण प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षीय समिती 2025, फलटण यांच्या वतीने “क्रांतीची धगधगती मशाल” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती 2025 च्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास पोलीस भरतीसाठी उपयुक्त अशा पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून ज्ञानाचा प्रकाश समाजात पसरवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत, तरुण पिढीला स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळावी व वाचन संस्कृती बळकट व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
“ज्ञानाचा दीप पेटवून अंधार दूर करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन” करत उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन आहे, हा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments