Tuesday, September 15, 2026
HomeUncategorizedभारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान दिनी संविधानाचा जागर

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान दिनी संविधानाचा जागर

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान दिनी संविधानाचा जागर

फलटण : भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शाखेच्या आदेशानुसार देशभर राबविण्यात येत असलेल्या २५ कलमी कार्यक्रमांतर्गत “आपले संविधान – आपले अधिकार” या अभियानाचा एक भाग म्हणून फलटण तालुका शाखेच्या वतीने संविधान दिनानिमित्त भव्य जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून फलटण येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत फळ विक्रेत्यांना, दुकानदारांना, रिक्षा चालक तसेच नागरिकांना भारतीय संविधानाची प्रस्तावना (Preamble) वितरित करून संविधान जागर व जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमाचे उद्दिष्ट भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत संविधानातील तरतुदी, हक्क आणि अधिकारांची माहिती पोहोचविणे असे स्पष्ट करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन खालील मान्यवरांच्या आदेशाने व उपस्थितीत पार पडले आयु. महावीर भालेराव,अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका, आयु. बाबासाहेब जगताप सर, महासचिव, आयु. विठ्ठल निकाळजे सर, कोषाध्यक्ष, आयु.चंद्रकांत मोहिते, कार्यालयीन सचिव
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ प्रवचनकार आयु. सोमीनाथ घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध उपासक उपासिका यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.यावेळी विशेष उपस्थिती जेष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, सामाजिक कार्यकर्ते हरीश काकडे उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून “भारतीय संविधान हा प्रत्येक नागरिकाचा अभिमान, समानता व न्याय देणारा जगातील सर्वोत्तम संविधान आहे” असा संदेश देत संविधान मूल्यांवरील बांधिलकी दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या या प्रशंसनीय उपक्रमाबद्दल भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उपासक–उपासिका यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments