Thursday, August 20, 2026
Homeसाताराप्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी चर्चेत; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी चर्चेत; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

फलटण :-  फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या उमेदवारांच्या मुलाखतींना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १२ (अनुसूचित जाती राखीव) या जागेसाठी विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये अपार उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुलाखतीदरम्यान प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवतींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती जाणवली. विशेष म्हणजे, महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

आपल्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करताना विकास काकडे म्हणाले,
“सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्यातून मी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे.”

त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसंपर्काचा उल्लेख आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वासमोर करण्यात आला.

साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष असलेले विकास काकडे हे सामाजिक, सांस्कृतिक आणि युवकवर्गातील विविध उपक्रमांत नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे आणि तळागाळातील कार्यामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहेत.

राजे गटाच्या मुलाखतीनंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये उमेदवारीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये विकास काकडे यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून,
“राजे गटाने विकास काकडे यांना उमेदवारी दिल्यास प्रभागासाठी सक्षम नेतृत्व आणि विजयाची ताकद मिळेल,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रभागातील नागरिकांचा उत्साह आणि काकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार पाहता, आगामी निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार हे निश्चित आहे. आता सर्वांचे लक्ष राजे गटाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments