Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशVideo: धक्कादायक! वृद्धेच्या पापण्यांतून निघाल्या 250 उवा अन् 80 अंडी; गुजरातमधील घटना

Video: धक्कादायक! वृद्धेच्या पापण्यांतून निघाल्या 250 उवा अन् 80 अंडी; गुजरातमधील घटना

Video: धक्कादायक! वृद्धेच्या पापण्यांतून निघाल्या 250 उवा अन् 80 अंडी; गुजरातमधील घटना

[ad_1]

Gujarat Medical Case News: गुजरातीलमधील सावरकुंडला तालुक्यातील लल्लूभाई शेठ आरोग्य मंदिर येथे एक अत्यंत दुर्मीळ आणि धक्कादायक वैद्यकीय प्रकरण समोर आल्याने स्थानिकांसह वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मृगांक पटेल यांनी 66 वर्षीय वृद्ध महिला गीताबेन मेहता यांच्या डोळ्याच्या वरच्या पापणीमधून तब्बल 250 पेक्षा अधिक उवा आणि 80 हून अधिक अंडी शस्त्रक्रियेद्वारे काढली आहेत. हा प्रकार अत्यंत क्वचित आढळणारा असल्याने याची चर्चा महाराष्ट्र-गुजरातसहित संपूर्ण मेडिकल फ्रटरनिटीमध्ये होत आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

 

दीड महिन्यांपासून डोळ्यांत सतत खाज

गीताबेन मेहता गेल्या दीड महिन्यांपासून डोळ्यांत सतत खाज सुटणे, जळजळ, पापण्या जड होणे आणि दृष्टी धूसर दिसणे या समस्यांनी त्रस्त होत होत्या. घरगुती उपाय आणि सामान्य आयड्रॉप्स वापरूनही काहीच फरक न पडल्याने त्यांनी अखेर सावरकुंडला येथील आरोग्य मंदिरात उपचारासाठी भेट दिली. सुरुवातीला साधा संसर्ग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र तपासणीदरम्यान मायक्रो लेंस आणि स्लिट लॅम्प मशीन च्या सहाय्याने नेमकी समस्येची खात्री करून घेतली असता डॉक्टरांच्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली. गीताबेन यांच्या पापणीच्या केसांमध्ये आणि त्वचेच्या खाली लहान-लहान उवांचा घोळ तयार झाला होता.

हे ही वाचा: मजेसाठी केली DNA टेस्ट… पण रिपोर्टमध्ये पत्नीचा निघाला असा ‘संबंध’ की पतीचे जगच कोसळले!

 

अत्यंत दुर्मिळ प्रकरण 

उवा सामान्यतः डोक्याच्या केसांत आढळतात. मात्र, डोळ्यांच्या पापण्या आणि भुवयांच्या भागात त्यांचा संसर्ग होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. डॉक्टरांच्या मते, कमी स्वच्छता, केसांमधील गंभीर उवा संक्रमणाचा पसरलेला प्रभाव, तसेच दीर्घ काळ दुर्लक्ष केल्याने हा संसर्ग डोळ्यापर्यंत पोहोचू शकतो.

हे ही वाचा: ‘अशी’ थंडी तुम्ही कधी पाहिलीच नसेल! -62°C चं थरारक दृश्य दाखवणारा Video सोशल मीडियावर व्हायरल

 

तत्काळ वृद्धेवर शस्त्रक्रिया

तत्काळ वृद्धेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या सूक्ष्म शस्त्रक्रियेत डॉ. पटेल यांनी अत्यंत दक्षता घेऊन प्रत्येक उवा  आणि त्याच्याशी जोडलेली अंडी काढून टाकली. या प्रक्रियेत अचूक हाताळणी, विशेष मायक्रो-सर्जिकल उपकरणे आणि सातत्याने दृष्टी निरीक्षण आवश्यक होते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर वृद्धेला मोठा आराम मिळाला असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

हे ही वाचा: मुलींवर अत्याचार, तहानलेल्या मुलांना टॉयलेटचं पाणी…330 मृत्यू, 2004 साली जगात घडलं होतं सर्वात क्रूर हत्याकांड

 

आरोग्य विभागातही मुद्दा चर्चेत 

हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात आणि आरोग्य विभागातही हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा घटना टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, डोक्याच्या केसांची नियमित स्वच्छता आणि लक्षणांकडे वेळेत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. गीताबेन मेहता यांना आता पुढील काही दिवस औषधोपचार व तपासणीसाठी नियमित फॉलो-अप देण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की थोडे दुर्लक्षही मोठ्या आणि वेदनादायक समस्येला आमंत्रण देऊ शकते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments