Tuesday, August 11, 2026
Homeसातारानगराध्यक्ष आरक्षणासाठी सोमवारचा निर्णायक दिवस; फलटण नगराध्यक्षपदासाठी कोणता प्रवर्ग ठरणार याकडे लक्ष

नगराध्यक्ष आरक्षणासाठी सोमवारचा निर्णायक दिवस; फलटण नगराध्यक्षपदासाठी कोणता प्रवर्ग ठरणार याकडे लक्ष

मुंबई | राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींतील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठीची सोडत सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालय येथे काढण्यात येणार आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने सर्व प्रमुख राजकीय पक्षांना यासंदर्भात पत्र पाठवून अधिकृत माहिती दिली आहे.

नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, ही सोडत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात पार पडणार आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये आरक्षणाचे आराखडे ठरवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

मंत्रालयातील सुरक्षा कारणास्तव, प्रत्येक राजकीय पक्षाला फक्त दोनच प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments