Thursday, August 20, 2026
Homeसातारा“ जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण...

“ जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण रस्ता दुरुस्तीसाठी ५ लाख निधी मंजूर”

“ जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण रस्ता दुरुस्तीसाठी ५ लाख निधी मंजूर”

फलटण : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाणास जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था, जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यालगत वाढलेले काटेरी कुंपण यामुळे नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. या रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. शेवटी सासकल जन आंदोलन समितीच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला यश मिळाले आहे.

सदर प्रश्नावर तोडगा निघण्यासाठी सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिबा मुळीक, उपाध्यक्ष विनायक नारायण मदने, सासकल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली मंगेश मदने, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, चांगुणा सर्जेराव मुळीक, राजेंद्र धोंडीबा घोरपडे, लक्ष्मीबाई रमेश आडके,सामाजिक कार्यकर्ते व भैरवनाथ फाउंडेशनचे ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, दिनेश दत्तात्रय मुळीक यांच्यासह सर्व पदाधिकारींनी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली.

ग्रामस्थांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माजी खासदार निंबाळकर यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावर आमदार सचिन पाटील यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधत सासकल गावासाठी क्र. 402 जा. क्र. ग्रापं-04/कावि/4848/2025 नुसार ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशा स्पष्ट सूचना देखील आमदारांनी दिल्या. यामुळे सासकल ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाली आहे.

सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांच्या वतीने आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments