फलटण शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ – पोलिसांचे आवाहन धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांची दगडफेक

0
22
फलटण शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ – पोलिसांचे आवाहन धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांची दगडफेक

फलटण – शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत जिंती नाका परिसरात दोन गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आधीच “भांडण न करता, तक्रार असल्यास थेट पोलीस स्टेशनला द्या” असे स्पष्ट आवाहन केले होते. मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांचा सल्ला धाब्यावर बसवत थेट दगडफेक सुरू केली.

या प्रकारामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला. परिणामी शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ व जय भवानी तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून 14 जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. भारतीय न्याय संहिता कलम 194 (2) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

अटकेत असलेले आरोपी (14 जण):

  1. विशाल पांडुरंग माळी (30)
  2. देविदास बापु माळी (25)
  3. संपत भरत माळी (24)
  4. अजय पांडुरंग माळी (29)
  5. रंगराव भरत माळी (27)
  6. अमर राजु माळी (30)
  7. नेताजी प्रकाश माळी (28)
  8. प्रकाश काळुराम माळी (50)
  9. अमोल आकाराम मोरे (22)
  10. रमेश संजय माळी (25)
  11. अजय रघुनाथ माळी (32)
  12. रोहित युवराज मोरे (16)
  13. सुशांत सुनिल जुवेकर (18)
  14. शंकर रामराव जुवेकर (30)

फरार आरोपी (1 जण):
15. अजय संजय जाधव (25)