Sunday, September 20, 2026
Homeसातारालेखणीचा धारदार योद्धा – सचिन मोरे यांचा वाढदिवस आज"

लेखणीचा धारदार योद्धा – सचिन मोरे यांचा वाढदिवस आज”

फलटण :- फलटण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात अनेक दिग्गजांनी लेखणीच्या सामर्थ्याने समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. त्यात आजच्या पिढीत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्य समन्वयक आणि वरिष्ठ युवा पत्रकार सचिन संपतराव मोरे.

आज ३० ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अष्टपैलू कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न.

लेखणीची धार – न्यायासाठी

“तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे,” हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश जीवनात उतरवणारे सचिन मोरे गेल्या २२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. समाजाच्या व्यथा, वेदना मांडण्यासोबतच त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे त्यांनी आपले ध्येय मानले आहे.

साप्ताहिकातून सुरुवात करताना तालुक्यातील छोट्या-मोठ्या घटकांना व्यासपीठ देणे, शंभरहून अधिक गावातील सामाजिक, व्यावसायिक व विकासात्मक प्रश्नांना आवाज देणे, हे त्यांच्या लेखणीचे बळ आहे.

प्रेरक वक्ता व प्रशिक्षक

सचिन मोरे हे केवळ पत्रकार नाहीत तर प्रभावी वक्ते व विक्री-विपणन क्षेत्रातील यशस्वी प्रशिक्षक आहेत. धैर्य फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड आणि दिल्ली येथे त्यांनी यशस्वी परिसंवाद घेतले आहेत. आजवर हजारो व्यवसायिकांना व वक्त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

समाजजागृतीचा ध्यास

“एक निर्धार बौद्ध आमदार” या संकल्पनेवर आधारित समाजजागृती मोहिमेदरम्यान त्यांची भाषणे समाजमाध्यमांवर गाजली होती. समाजातील प्रश्नांवर अभ्यास, चिंतन आणि योग्य तो मार्ग सुचविण्याची त्यांची शैली वेगळी आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सृजनशील संपादक, प्रेरणादायी वक्ते, समाजजागृतीचे ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व – सचिन मोरे यांना साहस Times यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments