“ज्येष्ठ विधीज्ञ व माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे यांचे निधन”

0
4
“ज्येष्ठ विधीज्ञ व माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे यांचे निधन”

फलटण – फलटण बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ व माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्याच्या सामाजिक, राजकीय व विधीक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्व. गावडे यांनी नगराध्यक्षपदासह विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांचे मार्गदर्शन व कार्य नेहमी स्मरणात राहील.

त्यांचा अंत्यविधी मंगळवार, दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता गोखळी येथे पार पडणार आहे.