गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसामग्री सवलतीच्या दरात उपलब्ध; दादासाहेब चोरमले यांची विद्यार्थ्यांना दिलेली मदतीची हाक –

0
16
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसामग्री सवलतीच्या दरात उपलब्ध; दादासाहेब चोरमले यांची विद्यार्थ्यांना दिलेली मदतीची हाक –

फलटण :-  फलटण शहरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सातारा जिल्हा अ‍ॅम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांच्या सहकार्यातून शालेय विद्यार्थ्यांना फक्त २५ रूपयांमध्ये ‘फुलस्केप’ वही उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच वहीची एम.आर.पी. ७० रूपये इतकी असून ती सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दादासाहेब चोरमले हे नेहमी सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रीय राहून समाजहिताचे उपक्रम राबवत असतात. त्याच सामाजिक जाणीवेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ही सवलत उपलब्ध करून दिली आहे.

ही वही गजानन चौक ते तेली गल्ली रस्त्यावर असलेल्या ‘न्यू गजराज किराणा स्टोअर्स’ मध्ये मिळणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आधार देणारा ठरणार असून समाजात सकारात्मक उदाहरण निर्माण करणारा आहे.