पांथस्थचा पहिला आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा श्रीलंकेत यशस्वीपणे पार पडला; बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांना दिली भेट

0
11
पांथस्थचा पहिला आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा श्रीलंकेत यशस्वीपणे पार पडला; बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांना दिली भेट

साहस टाईम्स :- पांथस्थ या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आणि तोही आपल्या शेजारील द्वीपदेश श्रीलंकेत! वैशाखी पौर्णिमा – म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी – या अभ्यास दौऱ्याचे विशेष औचित्य साधण्यात आले होते.

बुद्ध पौर्णिमा हा दिवस सम्यक संबुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही अत्यंत पवित्र घटना घडल्या असल्याने जगभरातील बौद्ध राष्ट्रांमध्ये मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी जगभरात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यादरम्यान श्रीलंकेतील ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणांना भेटी देऊन त्याचा अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे, श्रीलंकेची प्राचीन राजधानी अनुराधापूर येथे बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण सम्राट अशोक यांच्या कन्या थेरी संघमित्रा यांच्या हस्ते जेथे झाले होते, त्या पवित्र स्थळीच बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचा योग पांथस्थच्या अभ्यासकांना लाभला.

या अभ्यास दौऱ्यात अनुराधापूर, पोलोनारूवा, मिहिंतले, गल विहार, गंगारामया विहार, केलानिय विहार, सिगिरिया, तसेच अलुविहार विहार या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात आली. दिनांक १० मे ते १६ मे २०२५ दरम्यान हा दौरा पार पडला.

भारतीय उपखंडातील बौद्ध इतिहास, संस्कृती व वारसा समजून घेण्यासाठी श्रीलंका हा देश म्हणजे जणू चालताबोलता इतिहास आहे. प्राचीन भारताचा बौद्ध संस्कृतीसह संबंध पाहायचा असेल, तर श्रीलंकेला भेट देणे अनिवार्य ठरते.

पांथस्थचा हा पहिला आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा अत्यंत यशस्वी ठरला असून, पुढील काळात अशा आणखी अभ्यासपूर्ण यात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

श्रीलंकेच्या दुसऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी नोंदणी सुरू!
जे सदस्य पुढील श्रीलंका दौऱ्यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp समूहात सामील व्हावे:

समूह लिंक: https://chat.whatsapp.com/B6DsgMjWtCYFSkEx6Nca0f

सुरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )