Friday, August 21, 2026
HomeमनोरंजनCongress leader Nana Patole  letter to President regarding the Chief Justice protocol...

Congress leader Nana Patole  letter to President regarding the Chief Justice protocol |

Congress leader Nana Patole  letter to President regarding the Chief Justice protocol |

[ad_1]

नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौऱ्यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे.

सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान हा संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अवमान आहे. हा केवळ एका व्यक्तीच्या दुर्लक्षित वागणुकीपुरता मर्यादित नाही, तर भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर झालेला थेट आघात म्हणून याकडे पाहावे लागेल. ते आंबेडकरी विचारसरणीचे असल्याने त्यांना अशी वागणूक दिली का? विशेष म्हणजे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून त्यांना मिळालेली उपेक्षात्मक वागणूक ही सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बाब आहे.

सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणात राज्य सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकाराकडे वळले असून, हा फक्त प्रोटोकॉलचा भंग नव्हे, तर एका विचारधारेचा व संवैधानिक मूल्यांचा अवमान आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि संविधानिक संस्थांचा सन्मान अबाधित राहील, असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश यांचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप यापूर्वी पटोले यांनी केला होता. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष प्रोटोकॉल असतो, त्यांच्या दौऱ्याची माहिती आधिच दिलेली असते पण आम्हाला माहिती नव्हती असे अधिकारी सांगत आहेत हे पटणारे नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारने महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे. सरन्यायाधीश त्यावर गमतीने बोलले, पण तो प्रशासनाला इशारा आहे तो सरकारला कळला नसेल. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? का मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते?  हे समजले पाहिजे.  शाहू, फुले आंबेकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराचा व्यक्ती सरन्यायाधीश झाला त्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभिर्य नाही का? असेही नाना पटोले सोमवारी म्हणाले होते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments