Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशप्रेमापायी युवकाने घेतला गळफास! ‘इंस्टाग्राम पोस्ट’ने केलं उघड…

प्रेमापायी युवकाने घेतला गळफास! ‘इंस्टाग्राम पोस्ट’ने केलं उघड…

प्रेमापायी युवकाने घेतला गळफास! ‘इंस्टाग्राम पोस्ट’ने केलं उघड…

[ad_1]

बुलढाणा: मेहकर तालुक्यातील एका खेड्यातील तरुणाने प्रेम प्रकरणातून आणि कथित प्रेमिकेचे लग्न ठरल्याने नैराश्या पोटी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वी त्याने इंस्टाग्रामवर टाकलेल्या काही ‘पोस्टस’ आणि ‘कॉल रेकॉर्डिंग’ यापरिणामी यामुळे आत्महत्येचे कारण उघडं झाले.पोलिसांनी याप्रकरणी खोलात जाऊन तांत्रिक विश्लेषण करीत तब्बल ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणाच्या चुलत्याने याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राहुल आणि पायल (दोघांची नावे बदलली आहेत) यांचे मागील ३ वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. राहुल हा मेहकर तालुक्यातील एका गावचा रहिवासी असून पायल सिंदखेड राजा तालुक्यातील एका खेडेगावाची रहिवासी आहे. त्यांच्या लग्नाला मुलीकडच्या लोकांचा विरोध होता. त्यापरिणामी पायलचे लग्न नात्यातीलच एका मुलाशी ठरविण्यात आले होते. राहुल आणि पायलच्या संबंधाबाबत पायलच्या घरच्यांना माहीत झाल्यावर प्रकरणाने वेगळे वळण घेतले. पायलच्या घरातून विरोध सुरू झाला होता.

इंस्टावर पोस्ट आणि शेतात गळफास

दरम्यान राहुल ने काल १३ मे रोजी संध्याकाळी उशिरा शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी त्याने इंस्टाग्राम वर पोस्ट करुन तपशील नमूद करून कुणाच्या दबावात आत्महत्या करीत आहे ते लिहिले. एवढेच नव्हे तर राहुलने गावातील काही रहिवासीयांच्या व्हाट्सअप वर मेसेज करून आपल्या टोकाच्या निर्णयाचे कारणही स्पष्ट केले.

त्यानुसार मुलीच्या आत्याच्या पुतण्याने त्याला आणि त्याच्या आईला ‘नीट राहण्याची’ धमकी दिली. पायलच्या वडिलांनी देखील राहुलला सामूहिक आत्महत्या करण्याची धमकी देत , नाहीतर तू मर असेही सांगितलें.

तक्रारीत आरोपींनी राहुलला वेळोवेळी मारण्याची धमकी दिल्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे म्हटले आहे. तक्रारीवरून पायल चे आई वडील, आत्या, आत्याचा नवरा, आत्याचा पुतण्या यांसह एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments