Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रमेहुणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा वाद – इस्टेट एजंटचा  खून

मेहुणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा वाद – इस्टेट एजंटचा  खून

पुणे | प्रतिनिधी – साहस Times कात्रज परिसरात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली असून, मेहुणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे एका इस्टेट एजंटचा बांबू व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत खून करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

मृत इस्टेट एजंटचे नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असे आहे. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडेनगर, निंबाळकरवाडी) हे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेहुणीचे रोहित याच्याशी अनैतिक संबंध होते. मनोहर शिंदे यांनी याला वारंवार विरोध केला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. शुक्रवारी रात्री रोहितने गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे मनोहरला गाठले व साथीदारांच्या मदतीने त्याला बांबूने, लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने तपास सुरु केला. आरोपींचा माग काढण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. रोहितला पुण्यातून तर केशवला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक करण्यात आली आहे.

या खुनाच्या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments