Friday, August 21, 2026
Homeमनोरंजन‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीच्या निकालात किंचित वाढ

‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीच्या निकालात किंचित वाढ

‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीच्या निकालात किंचित वाढ

[ad_1]

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर झाला. ‘सीबीएसई’च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९३.६६, तर बारावीचा निकाल ८८.३९ टक्के लागला आहे. तर ‘सीबीएसई’चा महाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९६.६१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.६८ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालात किंचितशी वाढ झालेली आहे.

‘सीबीएसई’च्या दहावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून १ लाख १७ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १७ हजार २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ लाख १३ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी ही ९६.६१ टक्के इतकी आहे. तर ‘सीबीएसई’च्या बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून ३४ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ३१ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी ही ९०.६८ टक्के इतकी आहे. तर महाराष्ट्राच्या ‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातून दहावीच्या परीक्षेत ९६.०६ टक्के मुले व ९७.३४ टक्के मुली आणि बारावीच्या परीक्षेत ८८.८९ टक्के मुले व ९२.७५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

देशभरातून ‘सीबीएसई’च्या दहावीच्या परीक्षेसाठी २३ लाख ८५ हजार ७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २३ लाख ७१ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि २२ लाख २१ हजार ६३६ विद्यार्थी (९३.६६ टक्के) उत्तीर्ण झाले. तर बारावीच्या परीक्षेसाठी १७ लाख ४ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १६ लाख ९२ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १४ लाख ९६ हजार ३०७ (८८.३९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ‘सीबीएसई’तर्फे देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार गतवर्षी दहावीचा निकाल ९३.६० टक्के, तर बारावीचा निकाल ८७.९८ टक्के लागला होता. यंदा दहावीच्या निकालात ०.०६ टक्के, तर बारावीच्या निकालात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा
हेही वाचा

‘सीबीएसई’ दहावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत २.३७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण

विद्यार्थी – २०२४ – २०२५

मुली – ९४.७५ टक्के – ९५.०० टक्के

मुले – ९२.७१ टक्के – ९२.६३ टक्के

तृतीयपंथीय – ९१.३० टक्के – ९५.०० टक्के

‘सीबीएसई’ बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत ५.९४ टक्के अधिक मुली उत्तीर्ण

विद्यार्थी – २०२४ – २०२५

मुली – ९१.५२ टक्के – ९१.६४ टक्के

मुले – ८५.१२ टक्के – ८५.७० टक्के

तृतीयपंथीय – ५०.०० टक्के – १०० टक्के

लाखो विद्यार्थी नव्वदीच्या पार. . .

‘सीबीएसई’च्या दहावीच्या परीक्षेत १ लाख ९९ हजार ९४४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून ४५ हजार ५१६ विद्यार्थी ९५ टक्क्यांच्या पुढे गेले आहेत. तर बारावीच्या परीक्षेत १ लाख ११ हजार ५४४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून २४ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments