Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनपंचवटी कारंजावरील वाड्याचे आगीत नुकसान

पंचवटी कारंजावरील वाड्याचे आगीत नुकसान

पंचवटी कारंजावरील वाड्याचे आगीत नुकसान

[ad_1]

नाशिक – पंचवटी कारंजा येथील माधवजी चिवडा दुकानावर असलेल्या डॉ. जोशी यांच्या वाड्याला सोमवारी दुपारी आग लागली. आगीत जीवितहानी झाली नसली तरी वाड्यातील वस्तू खाक झाल्या.

पंचवटी कारंजा परिसरातील डॉ. जोशी यांच्या वाड्यात माधवजी चिवडा हे दुकान आहे. काही अंतरावर पंचवटी पोलीस चौकी आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाड्यात अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. पंचवटी अग्निशमन दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने वाड्यातील रवींद्र कापुरे (५४), शीतल कापुरे (४३), दीपक कापुरे (१३), साई कापुरे (नऊ) आणि काजल कापुरे (११) यांना बाहेर काढण्यात आले.

माजी नगरसेवक उल्हास धनवटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, किशोर ढगे यांसह इतरांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. प्राथमिक तपासात आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. आगीत वाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments