Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रForeign University Application Process Recommendation Letter Recommender Selection शिफारसपत्र बनवताना ...

Foreign University Application Process Recommendation Letter Recommender Selection शिफारसपत्र बनवताना …

Foreign University Application Process Recommendation Letter Recommender Selection शिफारसपत्र बनवताना …

[ad_1]

परदेशातील विद्यापीठांच्या अर्ज प्रक्रियेमध्ये शिफारसपत्राचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचे असते योग्य शिफारसकर्त्याची निवड करणे. शिफारसपत्रांबद्दल विद्यार्थ्यांचा असा समज असतो की कोणा उच्चपदस्थांकडून त्यांना शिफारस मिळाली तर परदेशी विद्यापीठ किंवा कॉलेजमधील प्रवेश किंवा शिष्यवृत्तीच्या त्यांच्या संधी वाढतात. मात्र, परदेशी विद्यापीठे शिफारसपत्र तपासताना विद्यार्थी व शिफारसकर्ता यांचा संबंध किती वर्षांचा आणि कशा प्रकारचा आहे हे जरूर बघतात. त्यामुळेच तुम्हाला शिफारस देणाऱ्या शिक्षक किंवा प्राध्यापकांचे पद महत्त्वाचे नसून तुम्ही त्यांच्याबरोबर किती वेळ व्यतीत केला आहे, ते शिक्षक/प्राध्यापक तुम्हाला कशाप्रकारे ओळखतात आणि तुमच्या गुणदोषांची वस्तुनिष्ठपणे कसे विश्लेषण करतात या बाबी महत्त्वाच्या आहेत.

एक प्रभावी शिफारसपत्रात खालील गोष्टींचा समावेश असतो.

● शिफारसकर्त्याची भूमिका आणि विद्यार्थ्याशी असलेले नाते

● विद्यार्थ्याचे अभ्यासातील योगदान

● विशिष्ट प्रकल्पांतील कामगिरीचे उल्लेख

● नेतृत्वगुण, समस्या सोडवण्याची पद्धत, वैचारिक स्पष्टता यांचे उल्लेख

● विद्यार्थ्याचा चारित्र्यदृष्ट्या समज आणि सामाजिक जाणीव

शिफारसकर्त्याने प्रत्येक मुद्दा ठोस उदाहरणासह मांडल्यास ते अधिक परिणामकारक ठरते.

लेटर ऑफ रेकमेंडेशन हे विद्यार्थ्याने त्याला शिकवलेल्या शिक्षक /प्राध्यापकांकडून किंवा त्याच्या शाळेतील कोणत्याही शिक्षकांकडून घ्यावे. ज्या क्षेत्रात किंवा विषयात विद्यार्थी करिअर निवडणार आहे त्या विषयाशी संबंधित प्राध्यापकांचे शिफारसपत्र जास्त महत्त्वाचे आहे. साधारणपणे प्रत्येक विद्यापीठाला अर्जासह तीन शिफारसपत्रे हवी असतात. परदेशी विद्यापीठांना ही शिफारसपत्रे विद्यार्थ्याला शिकवलेल्या किंवा त्याच्याबद्दल नीट माहिती असलेल्या, त्याच्याशी शैक्षणिक स्तरावर काम केलेल्या तीन वेगवेगळ्या शिक्षकांकडून मिळणे अपेक्षित असते. बऱ्याचदा शाळेबाहेरील एखादे शिक्षक, प्रोजेक्ट सुपरवायजर, एखाद्या ठिकाणी विद्यार्थ्याने जर इंटर्नशिप केली असेल तर तेथील वरिष्ठ आदींचे शिफारसपत्रही विद्यापीठांकडून स्वीकारले जाते.

काही विद्यापीठे फक्त दोन शिफारसपत्रेही स्वीकारतात. तुम्ही अर्ज करणार असलेल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर किंवा कॉमनअॅपवर ही माहिती नीट तपासून घ्यावी. बऱ्याचदा काही विद्यापीठे तीनपैकी एक शिफारसपत्र हे स्कूल काउन्सेलरकडून यायला हवे अशी अट घालतात. जर एखाद्या शाळेकडे स्कूल काउन्सिलर उपलब्ध नसेल तर विद्यार्थ्यांची पंचाईत होते. अशा वेळी त्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांकडून लेटर ऑफ रेकमेंडेशन घ्यावे. सर्वसाधारणपणे, अनेक विद्यार्थी दोन शिफारस पत्रे शिक्षक/प्राध्यापकांकडून आणि एक शिफारसपत्र हे प्राचार्यांकडून घेतात.

कॉमनअॅपवरील सर्व माहिती भारत असतानाच ‘रेकमेंडेशन्स’ या सेक्शनमध्ये तुमच्या शिफारसकर्त्यांचा ई-मेल अॅड करा. तुम्ही अर्ज जमा केल्यावर विद्यापीठ त्या रेकमेंडर्सना ई-मेल पाठवून तुमची शिफारस मागत असते. तुमच्या शिक्षक/प्राध्यापकांचा नेहमीच्या वापरामध्ये असलेला ई-मेल कॉमनअॅपवर लिहा. (कॉमनअॅप हे अमेरिकन विद्यापीठांना अर्ज करण्यासाठी उपलब्ध असलेले एक पोर्टल आहे. लेखमालेमध्ये पुढे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत) तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर तुमच्या रेकमेंडर्सना त्यांचा ई-मेल सतत चेक करायला सांगून तुमची शिफारस पत्रे पूर्ण करायला सांगा. तसेच, रेकमंडर्स काळजीपूर्वक निवडा. लवकरात लवकर त्यांना कॉमनअॅपवर रजिस्टर करून घ्या. त्यामुळे त्यांनी जमा केलेले अर्ज विद्यापीठांना अंतिम मुदतीपूर्वी पोचतील.

शिफारसपत्रे ही फक्त औपचारिकता नसून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाची, क्षमतेची आणि जबाबदारीची साक्ष देणारे दस्तावेज असते. योग्य शिफारसकर्त्यांची निवड करून, वेळेत आणि विश्वासार्ह पद्धतीने शिफारसपत्र मिळवणे ही यशस्वी परदेशी शिक्षणाच्या दिशेने एक अत्यावश्यक पायरी आहे.

विद्यार्थ्यांसाठी

लेटर ऑफ रेकमेंडेशन हे शक्यतो शाळेमधील शिक्षक/ प्राध्यापकांचे शिफारसपत्र घेणे योग्य राहील. मात्र शाळेबाहेरील कोणत्याही व्यक्तीचे शिफारसपत्र जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या किंवा त्यांच्या शिक्षणेतर उपक्रमांची किंवा इंटर्नशिप/वर्क एक्सपीरियन्सची योग्य माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून शिफारसपत्र घेणे योग्य ठरेल. तुमच्या शाळेतील महाविद्यालयातील शिक्षकांची चांगले ठेवा. दररोजच्या क्लासमध्ये सहभागी व्हा. शिक्षकांशी गुणांच्या पलीकडे जाऊन संवाद साधत रहा. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते तयार करा.

theusscholar@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments