
[ad_1]
8 Don 75 Enjoy Enjoy Song Out: नवीन वर्षाचं स्वागत आणि धमाल डान्स नाही, असं कसं शक्य आहे ना? आता नव्या वर्षाच्या स्वागताला सगळ्यांनाच नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाचं ‘एन्जॉय एन्जॉय’ हे धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, या गाण्यात शुभंकर तावडे, प्रियंका जाधव मुख्य भूमिकेत दिसले आहेत. ‘एन्जॉय एन्जॉय’ हे धमाल गाणं गायक आदर्श शिंदे याने गायलं आहे. ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी!’ हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
[ad_2]
Source link
